Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रनव्या कोरोनाचा राज्यात शिरकाव : सापडले ८ रुग्ण

नव्या कोरोनाचा राज्यात शिरकाव : सापडले ८ रुग्ण

मुंबईः

ब्रिटनमध्ये हाहाकार माजवलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचा आता महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. ब्रिटनमधून राज्यात परतलेल्या ८ जणांमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातही करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. “ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या