Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात २२५ अंगणवाडी केद्रांना नविन इमारती; अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीस शासनाची परवानगी

जिल्ह्यात २२५ अंगणवाडी केद्रांना नविन इमारती; अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीस शासनाची परवानगी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे.त्यानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका- मदतनीस भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिले आहेत. भरती प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई करु नये, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शीपणे करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या. बैठकीस समिती सदस्य गणेश अहिरे,कविता धाकराव, रेखा पवाार, सुनिता सानप, गितांजली पवार, कमल आहेर, शोभा बरके तसेच उप. मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) दिपक चाटे व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

कुपोषित बालकांचा बालकांचा आढावा यावेळी घेण्यात आला जानेवारी २०२१ अखेर नाशिक जिल्हयात मध्यम कुपोषित बालके १९५७ व तीव्र कुपोषित बालके ३३४ आहे.

अंगणवाडी सेविका-मदतनीस भरतीस शासनास परवानगी अंगणवाडी सेविका-अंगणवाडी मदतनीस-मिनी अंगणवाडी सेविका रिक्तपदाचा आढावा घेतला नाशिक जिल्हयात अंगणवाडी सेविका-२४१, अंगणवाडी मदतनीस ९६४ मिनी अंगणवाडी सेविका २३ रिक्त पदे आहेत. शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करणेबाबत सभापती आहेर यांनी आदेश दिले. भरती प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई करु नये, तसेच भरती प्रक्रिया पारदशीपणे करण्यात यावी, जि.प. पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य यांना भरती प्रक्रियाबाबत अवगत करण्यात यावे. वर्तमानपत्रात भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात यावी अशा सुचना सभापतींनी दिल्या.

२२५ अंगणवाडी केद्रांना नविन इमारती

जिल्हा नियोजना समिती मार्फत आदिवासी विभागातील अंगणवाडी केद्रांना नविन इमारती बांधकामासाठी सन २०२०.२१ या आर्थिक वर्षात रुपये १० कोटी निधी मंजूर असल्याने आदिवासी भागातील १५९ अंगणवाडी केद्राना व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ६६ अंगणवाडी केंद्राना नविन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्याबाबत आजच्या सभेत नियोजन करण्यात आलेले आहे.

उपडयावरील समाजमंदीरात भरणा-या केंद्राना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात २२५ नविन अंगणवाडी इमारती होणार आहे. असे सभापती अश्विनी आहेर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या