Monday, April 29, 2024
Homeधुळेअमरावती व भोगावती नदीच्या संगमावर होणार नवीन पूल

अमरावती व भोगावती नदीच्या संगमावर होणार नवीन पूल

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

माजीमंत्री आ जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून शिंदखेडा-दोंडाईचा रस्त्यावर रेल्वे गेट जवळ उड्डाणपूल आणि उड्डाणपूलावरून खाली आल्यानंतर दोंडाईचा शहरात प्रवेश करतेवेळी अमरावती आणि भोगावती नदीचा संगम रावल गढी जवळ होतो. याठिकाणी नवीन दीड कोटींचा पूल मंजूर झाला असून या कामाची पाहणी आ.जयकुमार रावल यांनी आज केली.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून छोटासा पूल कम पाईप मोरीचे बांधकाम याठिकाणी होत.े त्यामुळे भोगावती नदीला पूर आल्यावर पुलावरून वाहतूक बंद होत असे. त्याठिकाणी आता पूल तयार झाल्यावर समस्या निकाली निघणार आहे.

पाहणी प्रसंगी बांधकाम सभापती निखिल जाधव, अभियंता शिवनंदन राजपूत, संदीप पाटील, विरेंद्र राजपूत, आदी उपस्थित होते आ. जयकुमार रावल यांनी पर्यटन मंत्री असतांना अमरावती नदीचे सुशोभिकरण करण्यासाठी पर्यटन विभागातून निधी आणून रावल गढी पासून ते थेट बायपास रोडवरील मोठ्या पुलापर्यंत तर दुसरीकडे डी आर हायस्कूल ते महादेवपूरा परिसर नदी काठ पर्यंत मुंबईसारखी चौपाटीचे काम केले आहे.

याठिकाणी दररोज पायी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. आता सदर रस्ता पुलाने जोडला गेल्यानंतर याचे सौंदर्य वाढणार असून येत्या सहा महिन्यात हे काम होईल, असा विश्वास आ. रावल यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी आ.रावल म्हणाले की, दोंडाईचा शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मंत्री पदाच्या काळात नंदुरबार चौफुली ते गर्ल्स हायस्कूल पर्यंत रस्त्याचे सुशोभीकरण, अमरावती रिव्हर फ्रंट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधान पथ, त्याच रस्त्यावर पुढे डॉ.कलाम सेतू, पालिकेची सुसज्ज इमारत, बाम्हणे रोड वर उड्डाणपूल तसेच गर्ल्स हायकुल जवळ उड्डाणपूल अशी अनेक कामे मंजूर केली होती. त्यातील बहुतांश कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या 6 महिन्यात सर्व कामे पूर्ण करून हा शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून अमरावती आणि भोगावती नदीवर होणारा पूल म्हणजे एक ऐतिहासिक काम असून पुढच्या 50 ते 60 वर्षापर्यंत हा पूल लोकांच्या सेवेत राहणार असल्याचे आ रावल यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या