Friday, April 26, 2024
Homeनाशिकलालपरीचे नव्याने ब्रँडिंग!

लालपरीचे नव्याने ब्रँडिंग!

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संकटामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात प्रवाशांपासून दुरावलेली लालपरी व शिवनेरी पुन्हा जुन्या जोमाने धावावी या उद्देशाने आता एसटीनेही मार्केटींगचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने शिवनेरी व लालपरीवर एक छोटासा व्हिडीओ बनविण्यात आला असून तो सर्वत्र पाठवला जात आहे. विकासात एसटीचे योगदान किती महत्त्वाचे आहे. आजही स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी एसटी कशी महत्त्वाची आहे, हेच या माध्यमातून प्रवाशांच्या मनावर बिंबवले जात आहे.

करोनामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर शासनाने निर्बंध आणले आणि त्याचा सर्वाधिक फटका रेल्वे व एसटीला बसला. त्यातही एसटीच्या ‘लाल परी’चे चाकच या काळात थंडावल्याने लाखो प्रवाशांची वाहतूकच ठप्प झाली. मात्र आता अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के व आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली आहे.

एसटीपासून काही दिवस दूर राहिलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटीने एक छोटी व्हिडीओ क्लिप बनवली असून त्या माध्यमातून आजही स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी एसटी किती महत्वाची आहे, आणि ग्रामीण व शहरी भागाच्या विकासात एसटीचे योगदान कसे आहे याची माहिती याद्वारे दिली गेली आहे. यात प्रामुख्याने शिवनेरी व लालपरी(परिवर्तन) या बसेसवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे.

करोनासाठी शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्याचे पालन केले जाते, प्रत्येक बस आतून व बाहेरून सॅनिटाईज केली जाते, प्रवाशांचेही हात निर्जंतुक केले जातात, एसटीचे चालक वाहक व प्रत्येक प्रवासी मास्क लावतील याची दक्षता घेतली जाते हाही संदेश दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या