Thursday, April 25, 2024
Homeक्रीडानेट झिरो इंडिया : नाशिकच्या २२ सायकलिस्टसची दिल्लीत जनजागृती

नेट झिरो इंडिया : नाशिकच्या २२ सायकलिस्टसची दिल्लीत जनजागृती

नाशिक |प्रतिनिधी Nashik

नाशिक सायकलिस्टसच्या (Nashik Cyclist) नेट झिरो इंडिया (Net Zero India) या पर्यावरण संवर्धन (Environment Conservation) उपक्रमाला आज नवी दिल्लीतील इंडिया गेट (India gate new delhi) येथून सुरुवात झाली. यावेळी नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे 22 सदस्य नाशिक येथून दिल्ली येथे गेले आहेत. यावेळी नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे (President Rajendra Wankhede) यांच्या सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला….

- Advertisement -

आपल्या जीवनशैलीनुसार हरित वायूंचे प्रमाण वाढल्याने वातावरणाचे तापमान वाढत आहे. हे हरित वायूचे प्रमाण कमी व्हावे म्हणून प्रत्येक भारतीयांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा. कमीत कमी आठवड्यातून एक दिवस “नो व्हेहीकल डे” (No Vehicle Day) पाळावा. ज्या नागरिकांना शक्य नाही त्यांनी महिन्यातून एक दिवस तरी सायकलचा वापर करावा व गाडीचा वापर टाळावा.

अशाप्रकारची खूणगाठ मनाशी बांधल्यास नक्कीच वाढता पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान ठरेल. असे मत नाशिक सायकलीस्टने व्यक्त केले. या उपक्रमासाठी शासनाने पुढाकार घेतल्यास नक्कीच एक चांगला बदल घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे.

गांधी जयंतीच्या (Mahatma Gandhi Birth Anniversary) निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे नेट झिरो इंडिया या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. तसेच हा संदेश घेऊन आज इंडिया गेट येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या राईड दरम्यान दिल्ली येथील नागरिकांशी संवाद साधून आपल्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकलचा वापर करावा याबद्दल जनजागृती करणार आहेत.

यांचा आहे सहभाग

अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, उपाध्यक्ष किशोर माने, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, रोहिणी नायडू, माधवी रहाळकर, माधुरी गडाख, मुकुंद ओक, जयश्री ओक, रमेश धोत्रे , रमेश पवार, रामदास सोनवणे, माधवराव पवार, जाकीर खान पठाण, साधना दसाने, भक्ती दुसाने, दविंदर सिंग भेला, ऐश्वर्या वाघ, जयंत भदाणे व कर्नल शिवनारायण मिश्र हे सदस्य सहभागी झालेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या