Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशआज जाहीर होणार NEET UG परीक्षेचा निकाल, कसा आणि कुठे पाहाल?

आज जाहीर होणार NEET UG परीक्षेचा निकाल, कसा आणि कुठे पाहाल?

दिल्ली | Delhi

आज नीट युजी 2022 (NEET UG 2022) चा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवार हा निकाल नीट युजीच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) जाऊन तपासू शकतात.

- Advertisement -

असा चेक करा निकाल

सर्वात आधी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.

होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.

तिथे मागितलेली माहिती सबमिट करा. (रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी)

निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिटंही काढू शकता.

दरम्यान, नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच, NEET UG 2022 परीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात आली होती, एकूण १८,७२,३४३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीव्हीएससी, बीडीएससी यासह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. अर्जाच्या बाबतीत, ही देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या