Friday, April 26, 2024
Homeनाशिकआज 'नीट' परीक्षा

आज ‘नीट’ परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) आज रविवारी (दि.13 ) देशभरात होत आहे.

- Advertisement -

या परीक्षेसाठी नाशिक क्षेत्रात 44 परीक्षा केंद्र असून शहरातील परीक्षा केंद्रांसह सटाणा , मालेगावला परीक्षा केंद्र असणार आहे. सुमारे सोळा हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ‘जेईई मेन्स’ परीक्षेसाठी नाशिकमध्ये केवळ पाच परीक्षा केंद्रे होते. दोन सत्रामध्ये सहा दिवस ही परीक्षा पार पडली. परंतु नीट परीक्षेला एकाच दिवशी व एकाच वेळी सुमारे सोळा हजार विद्यार्थी समोरे जाणार आहे.

सुरक्षिततेची बाब म्हणून परीक्षा केंद्रांवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंग आदी बाबींची खबरदारी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या असून , यामुळे संभाव्य गर्दी टळणार आहे.

नीट परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएस , बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षा केंद्रामध्ये बदल

नैशनल टेस्टिंग एजन्सीने गुरुवारी (दि. 10 ) परीपत्रक जारी करून नाशिकमधील दोन परीक्षा केंद्रामध्ये बदल करत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार यापूर्वी जाहीर केलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली येथील एकलव्य निवासी शाळा येथील परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला असून , या परीक्षा केंद्रावरील विद्याथ्यांची परीक्षा साउथ देवळाली येथील केंद्रीय विद्यालय ( एअर फोर्स स्टेशन ) येथे घेतली जाणार आहे.

तसेच बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या सटाणा येथील इंग्लिश मिडीयम स्कूल या परीक्षा केंद्रावरील विद्यालयांची आसन व्यवस्था नाशिक शहरातील पंचवटी परीसरातील सरस्वती नगर येथील के. के. वाघ युनिवर्सल स्कूल येथे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या