Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशNEET 2020 : उद्या नीट परीक्षा

NEET 2020 : उद्या नीट परीक्षा

नवी दिल्ली | New Delhi –

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असलेली वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) उद्या रविवारी घेण्यात येणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने,

- Advertisement -

देशभरातील केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यथायोग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकार्‍याने शनिवारी याबाबतची माहिती दिली. देशभरातून सुमारे 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, भौतिक दूरता नियमाचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशात 2,546 केंद्रे स्थापन करण्याची योजना होती, आता 3,843 केंद्रे असणार आहेत. याशिवाय, प्रत्येक खोलीत आता 24 ऐवजी फक्त 12 विद्यार्थीच बसणार आहेत, असे अधिकार्‍याने सांगितले.

करोनामुळे ही परीक्षा दोनवेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. 15.97 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपले नाव नोंदविले आहे. प्रवेश मार्ग, परीक्षा कक्ष आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षालय कक्ष उघडण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मुखाच्छादन अनिवार्य राहणार आहे, असे ते म्हणाले.

परीक्षा केंद्रावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या मार्गदर्शिका जारी करण्यात आल्या असून, सर्व विद्यार्थी वेळेच्या आधी केंद्रावर पोहोचतील, यासाठी राज्यांनी आवश्यक ती वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी, असे निर्देशही जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या