कडुनिंब वृक्षांंवर हुमनी भुंगेर्‍यांचा हल्ला

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याभरात (Ahmednagar District) ठिकठिकाणी कडुनिंबांचे वृक्ष (Neem Tree) वाळुन जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निसर्गप्रेमी (Nature lover) तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन (Biodiversity research and conservation) समुहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण (District-wide survey) करण्यात आले. यावेळी हुमनी किटकांच्या (Humani insects) भुंगेर्‍यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर कडुनिंब (Neem Tree) वृक्षांवर दिसुन येत आहे.

निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते (Nature scholar Jayaram Satpute) यांच्या मार्गदर्शनाने निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन (Nature lovers and biodiversity research and conservation) समुहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण (District wide survey) करण्यात आले. या सर्वेक्षणात मनपा उद्यानविभागप्रमुख मेहेर लहारे यांच्यासह उमेश भारती, अतुल सातपुते, राजेंद्र बोकंद, संजय बोकंद, विजय परदेशी, अजिंक्य सुपेकर, विठ्ठल पवार, शशीभैय्या त्रिभुवन, श्रीराम परंडकर, संदीप राठोड, अंकुश ससे,सतिश गुगळे, नितीन भोगे, मच्छिंद्र रासकर, प्रविण साळुंके, विलास नांदे, अमित गायकवाड आदी सुमारे 30 निरीक्षक सहभागी सहभागी झाले होते.

भारतामध्ये हुमणीच्या (Humani) सुमारे 300 प्रजाती असून राज्यात हुमणीच्या (Humani) लिकोफोलिस (Licopholis) आणि होलोट्रॅकिया (Holotrachea) अशा दोन प्रजाती आढळतात. हुमणीचा जीवन क्रम अंडी, अळी, कोष व किटक या अवस्थांमधुन पुर्ण होतो. हुमणी अळीचे मुख्य खाद्य वनस्पतींचे मुळे व साली असुन अळीअवस्थेत ती शेतीपिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. पावसाळा सुरू होताच म्हणजे साधारणतः जून महिन्यातील पहिल्या, दुसर्‍या आठवड्यात भुंगेरे (Beetle) जमिनीतून बाहेर येऊन, थव्यांच्या रूपाने सूर्यास्तादरम्यान कडुनिंब, बाभूळ या झाडांवर रात्री गोळा होऊन त्यांच्या पानांवर उपजीविका करतात तर दिवसा जमिनीत राहतात.

हे भुंगेरे Beetle) सुमारे 100दिवस जगतात. कोशातुन बाहेर पडलेला प्रौढ भुंगेरे हा मुख्यत्वे कडुनिंब व बाभुळ या वृक्षांची पाने खातो. यावर्षी या हुमणी किटकांचे प्रमाण जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतके प्रचंड आहे. संपुर्ण कडुनिंबाचे झाडे पुर्णपणे वाळुन गेले आहेत.

कीड नियंत्रणासाठी उपाय

कोणतेही रासायनिक औषधे वापरून या किडीचे नियंत्रण करण्यापेक्षा रूईच्या चिकाची फवारणी तसेच बेडुक तसेच कावळे, ससाना, चिमण्या अशा नैसर्गिक अन्नसाखळ्यांद्वारे या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येवु शकतो. जास्त प्रादुर्भावग्रस्त शेतात हुमणीस कमी बळी पडणारे पिक घेऊन पिकांची फेरपालट केल्यास हुमणी नियंत्रणात आणता येईल अशी माहीती निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहामार्फत देण्यात आली आहे.

किटकांची वाढती संख्या चिंताजनक

वातावरणातील व नैसर्गिक अन्नसाखळ्यांच्या असमतोलामुळे हुमणीच्या किटकांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसुन येत आहे. हुमनी हा शेती फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी किटक असुन यांची वाढती संख्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याची माहिती वनस्पती अभ्यासक प्रतिम ढगे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *