Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाला आणखी एक धक्का! नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. डॉ. गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणूनही नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर ठाकरेंची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

- Advertisement -

महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.

नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी असा प्रस्ताव मांडला. त्याला प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर शिशिर शिंदे यांनीही थेट उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांनीही काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

मुंबई हादरली! हात-पाय तुटलेल्या अवस्थेत गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

- Advertisment -

ताज्या बातम्या