Monday, April 29, 2024
Homeनगर20 दिवसांत पोलीस धावणार 75 किलोमीटर

20 दिवसांत पोलीस धावणार 75 किलोमीटर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्हा पोलीस दलाकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील जास्तीत जास्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी यामध्ये सहभागी होऊन 25 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान 75 किलोमीटर अंतर धावण्याचे आव्हान पूर्ण करण्याचे अयोजन केले आहे. दरम्यान यासाठी पोलिसांनी आठवड्यातून चार दिवस एक तास सराव करण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दौड कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्यातील प्रत्यक्ष हजर संख्याबळाच्या किमान 20 टक्के पोलीस अधिकारी, अंमलदार असा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. 25 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान दररोज तीन किलो मीटर याप्रमाणे 20 दिवसांत 60 किलोमीटर धावण्याचे आव्हान पूर्ण करायचे आहेत. तर शेवटच्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी 15 किलोमीटर अंतराची दौड भूईकोट किल्ला परिसर कॅम्प येथे एकत्रित पूर्ण करण्यात येणार आहे.

सदर दौड करिता पोलीस ठाणे स्तरावर एक पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या