नाशिक जिल्हा बँकेने केला थकबाकीदारांच्या ट्रॅक्टरचा लिलाव; शेतकरी संतप्त

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम चालू केली आहे. या अंतर्गत बँकेने थकबाकीदारांकडून जप्त केलेल्या ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात आला.

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

या अंतर्गत बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम चालू केली आहे. त्यानुसार, सटाणा तालुक्यातील ७ ट्रक्टर जप्त केलेले होते. या ७ टॅक्टरची तालुका निबंधक यांच्याकडून मूल्यांकन करून बुधवारी (दि.१०) सटाणा येथे जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता.

या लिलाव प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळाला असून सातही ट्रँक्टरचा लिलाव करण्यात आला. यातून बँकेस थकबाकी पोटी १६ लाख पाच हजार रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित सभासद हे सन २००९ ते २०११ ह्या कालावधीतील आहेत.

थकबाकीदाराना बँकेने कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे ही कार्यवाही करण्यात आली होती.

सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळावी

जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे.

या योजनेस दिनांक २८ फेब्रुवारीपावेतो मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *