Wednesday, April 24, 2024
Homeजळगावराष्ट्रवादीच्या ता.अध्यक्षावर परस्पर चेक वटविण्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या ता.अध्यक्षावर परस्पर चेक वटविण्याचा आरोप

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील बोरखेडा बु॥ गावाच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साहेबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात कोणताही संबंध नसतांना…

- Advertisement -

जवळपास १ लाख ६५ हजारांचे दोन चेक काढले असा आरोप बोरखेडा बु॥ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा सौ. सुशिला आण्णा कांबळे व त्यांचे पती आण्णा कांबळे यांनी पत्रपरिषदेत केला आहे. तसेच दिनेश पाटील यांच्या सांगण्यावरुन कैलास पाटील याने माझे पती काळी जादू करतात अशा आशयाची सोशल मिडीयावरुन चित्रफीत व्हायरल केली आणि गावात आमची बदनामी केल्याचे देखील म्हटले.

शहरातील शासकिय विश्रामगृहात बोरखेडा बु॥ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा सौ. सुशिला आण्णा कांबळे यांच्या तफे पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आण्णा कांबळे हे देखील उपस्थित होते. पुढे माहिती देतांना सुशिला कांबळे म्हणाल्या की, आम्ंही आमच्या वडीलोपार्जीत मालकीची जमीन गावात महादेव मंदिरासाठी बक्षिसपत्र करुन दिलेली आहे. नवरात्रीच्या दिवसांत या मंदिराच्या जागेवर पूजा-अर्चा होत आणि नवरात्रीनिमित्त आमच्याकडे काही पाहूणे आलेले होते.

या काळात दिनेश पाटील यांच्या सांगण्यावरुन कैलास पाटील याने आमच्याकडे आलेल्या नातेवाईकांसह आमचेही फोटो काढून त्याचा गैरवापर म्हणून आण्णा कांबळे हे काळी जादू करण्यासाठी बाहेारहून लोक आणतात अशा प्रकारचा प्रचार करतांना सोशल मिडीयाचा वापर केला. प्रसारीत झालेल्या चित्रफीतीमुळे गावात आमच्या घराण्याची बदनामी झाली. आता प्रसारीत झालेल्या चित्रफीतीनुसार आम्ही काळी जादू करतो हे सिध्द करुन दाखवा नाही तर आम्हीच दिनेश पाटील यांचा काळाबाजार बाहेर काढत असल्याचे आव्हान त्यांनी पत्रकार परीषदेतून करतांनाच दिनेश पाटील यांनी यापूर्वी केलेल्या बाजारा ओट्याच्या कामातील लाखो रुपयांचा काळाबाजार उघड केल्याचे सांगून मी सरपंच असतांनाच्या काळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नसतांना व अर्थाअर्थी त्यांचा कुठलाही संबंध नसतांना, त्यांना ४० हजार आणि दुसर्‍या टप्प्यात १ लाख २० हजार रुपयांचा जो चेक देण्यात आला आह,े तो कोणत्या कामाचा हे दाखवावे असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित करुन दिलेल्या चेक पोटी केलेल्या कामाचा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करुन माहिती मागीतली आहे. मात्र अद्यापही आम्हाला माहिती दिली जात नाही. आमच्यावर काळी जादू संदर्भात झालेल्या प्रचाराबाबत आम्ही मानहानीच्या दावा दाखल करणार असून आम्ही जर जादू टोना केला असता तर न्याय मागण्यासाठी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांपुढे आलो नसतो असेही सरपंचा म्हणाल्या. तसेच दिनेश पाटील यांनी आतापर्यंत बोरखेडा ग्रामपंचातीमध्ये कोरोडा रुपयांचा घोटाळा केल्याचे देखील त्यांनी सांगीतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या