शहरविकासासाठी जास्ती जास्त निधी मिळवून देऊ – आदिक

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहराच्या विकासासाठी सरकार दरबारी वजन वापरून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक (NCP State General Secretary Avinash Adik) यांनी दिले,

शहरातील नगरसेवकांचे शिष्टमंडळ काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक (NCP State General Secretary Avinash Adik) यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. यावेळी नगराध्यक्षा अनुराधताई आदिक (Mayor Anuradhatai Adik), जेष्ठ नेते भाऊसाहेब डोळस, नगरसेवक मुक्तार शहा, ताराचंद रणदिवे, दीपक चव्हाण, रवी पाटील, कलीम कुरेशी, दीपक चरण चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अल्तमश पटेल, रोहित शिंदे, रईस जहागीरदार, नगरसेविका वैशाली चव्हाण, जयंत चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक मुक्तार शहा यांनी सांगितले की पालिकेच्यावतीने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत, शहरातील मिनी स्टेडियमसह आदी ठिकाणच्या राहिलेल्या विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, आपले राज्यातील सर्व मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे आपण हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.

अविनाश आदिक (Avinash Adik) म्हणाले, देशासह राज्यात करोनामुळे जवळपास एक ते दीड वर्ष वाया गेले आहे. यामुळे सर्वच यंत्रणा ठप्प झाली आहे, आता काही प्रमाणात निर्बध कमी केले आहे, परंतु पुन्हा तिसरी लाट येण्याचा धोका आहे असे बोलले जाते. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडे निधीची कमतरता आहे. तरीपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आपल्याला निधी देण्याचा शब्द दिला आहे.

राज्याचे क्रीडा मंत्री सुनिल केदार (State Sports Minister Sunil Kedar) यांच्याशी आदिक यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून मिनी स्टेडियमच्या निधीबाबत चर्चा केली ना. केदार यांनी तात्काळ निधी देण्याचे मान्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *