Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा एनसीबीवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा एनसीबीवर आरोप

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोना Corona काळात संपूर्ण चित्रपटसृष्टी मालदिव आणि दुबईमध्ये Maldiv & UAE होती. त्याकाळात अभिनेते आणि अभिनेत्रींनवर दहशत माजवून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) Department of Narcotics Control Bureau त्यांच्याकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप Serious allegations of recovery राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक NCP spokesperson Nawab Malik यांनी गुरुवारी केला.

- Advertisement -

दुबई आणि मालदिवमधून वसुली होत असताना एनसीबीचे क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा दावाही मलिक यांनी केला. यावेळी मलिक यांनी मालदीवची छायाचित्रे उघड केली. वसुलीवेळी समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असे सवाल करताना मलिक यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली.

अभिनेता सूशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर लगेच रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री आणि अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम झाले, असा आरोपही मलिक यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या