Tuesday, April 23, 2024
Homeनगरजिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात मतभेद ?

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात मतभेद ?

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना त्यांच्या जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथे होणार्‍या इमारत भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पारनेरच्या आमदारांचे नाव न टाकल्याने ऐनवेळी मोठा बदल करण्याची वेळ आली. हे बदल झाले असले तरी आमदार समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये असलेले मतभेद पुन्हा उफाळल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

- Advertisement -

पारनेरचे असलेले महानगर बँकेचे तसेच नगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथील काळाचौकी येथे इमारत भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवर पवार, थोरात यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार व कर्जत – जामखेडचे आ. रोहित पवार यांचे नाव टाकण्यात आले होते.

परंतु त्यांच्याच तालुक्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नावाला स्थान न दिल्यामुळे सोशल मीडियातून जिल्हाभरात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. आमदार निलेश लंके समर्थकांन मधून याविषयी थेट प्रतिक्रिया देण्यात येत होती. जी.एस. महानगर बँकेचे चेअरमन उदय शेळके हे पारनेर तालुक्यातील असल्याने पारनेर तालुक्यातील आमदारांना या पत्रिकेवर स्थान न दिल्यामुळे आमदार निलेश लंके समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली.

यामुळे ऐनवेळी फेरबदल करावा लागला असून पुन्हा पत्रिका नव्याने प्रसिद्ध करावी लागली आहे. पंरतु आ. लंके यांचे नाव टाळल्याने आले होते हे गुलदस्त्यातच असून यामागे नेमके काय राजकारण आहे हे येणार्‍या काळात नक्कीच दिसेल. पारनेर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीमध्ये अजूनही मतभेद आहेत का हे येणारा काळ काय ते सांगेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या