Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांचं 'ओएसडी' व्हावं तर सोमय्यांना...”; नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक...

“माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांचं ‘ओएसडी’ व्हावं तर सोमय्यांना…”; नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक टोला

मुंबई l Mumbai

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांना सूचना देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बराच रस घेत आहेत. त्यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे, नाहीतरी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त्यांचा भरपूर अनुभव आहे. तर किरीट सोमय्या यांनी तपासयंत्रणांचा प्रवक्ता म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी, असा टोला नवाब मलिक यांनी ट्विट करुन लगावला आहे.

‘तसेच ‘उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत’, अस सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केलं आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यान नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या आरोपांचा सपाटा लावला होता. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपासयंत्रणांच्या सदोष भूमिकेवर नवाब मलिक यांनी बोट ठेवले होते. ही दोन्ही प्रकरणे नवाब मलिक यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. या सगळ्यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे आपल्या घरी लवकरच ईडी किंवा सीबीआयची धाड पडेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या घरावर खरंच तपासयंत्रणांची धाड पडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या