Friday, April 26, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना करोनाची लागण

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना करोनाची लागण

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना करोना झाल्याची बातमी ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

खासदार सुनील तटकरे यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, “काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.”

अजित पवार, सुनील तटकरे यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांंच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुनील तटकरे यांना कोरोनाची लगण झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या वर प्रेम करणार्‍यांकडून, हितचिंतकांकडून तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या