Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयअजित पवार यांना मुख्यमंत्री तर शरद पवार यांना पंतप्रधानपदी पहायचे आहे -...

अजित पवार यांना मुख्यमंत्री तर शरद पवार यांना पंतप्रधानपदी पहायचे आहे – डॉ. अमोल कोल्हे

पुणे |प्रतिनिधी| Pune

पिंपरी चिंचवडचा (Pimpri Chinchwad) कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून (Ajit Pawar) अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री (CM) पदी बसलेले बघायचे आहे. तसेच शरद पवारांना (Sharad Pawar) देशाच्या पंतप्रधानपदी (PM) पाहायचे असेल, तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन ही राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) यांनी केले. भोसरीमध्ये (Bhosari) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा (NCP workers meet) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) म्हणाले की, तुम्ही माझ्यासाठी जीवाचे रान केले, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची माझी वेळ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शरद पवार (Sharad Pawar) हे लक्ष घालत आहेत. आपल्याला त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. पण जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना (Sharad Pawar) पाहायचे असेल, तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असे ते म्हणाले. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बाबतीत आहे.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) सोबत शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला होतो. त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा ते पाहत होते. त्यांना न्याहाळत मी होतो. मनात त्यावेळी विचार आला की, अजितदादांनी याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना येथील प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. हा योग पुन्हा पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेले बघायचे आहे, ही माझी भावना असल्याचे ते म्हणाले.

कोल्हे (Amol Kolhe) पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवडसाठी (Pimpri Chinchwad) अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता दादांना आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज असल्याचेही अमोल कोल्हे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या