Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदमानिया यांनी चुकीचे आरोप करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला: खडसे

दमानिया यांनी चुकीचे आरोप करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला: खडसे

मुंबई:

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सामाजिक कार्यकर्ता दमानिया यांनी चुकीचे आरोप करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

फडणवीस यांनी फोन करुन गुन्हा दाखल करायला लावला. असा आरोप देखील खडसे यांनी केला आहे. मात्र दमानिया यांनी तातडीने या आरोपांचे खंडन करत खडसे यांनी आपला छळ केल्याचा पुनरूच्चार केला आहे तर आपला उल्लेख केल्यास गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.

खडसे म्हणाले की, ‘दहा बारा मंत्र्यांवर आरोप झाले. सगळ्यांना क्लीनचीट मिळाली. मी एकटाच कसा राहिलो. मी निर्दोष होतो. ज्यांच्याकडे जावे ते देवेंद्र यांचे नाव घेत होते. मला नाराजी होती. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला.’ असे देखील खडसे यांनी म्हटले आहे. ‘राजीनामा द्या, ३ महिन्यानंतर पुन्हा घेतो असे आश्वासन दिले गेले.

मला बदनाम करण्यात आले. दाऊदशी संबंधित जोडले गेले. माझे म्हणणे ऐकलेच नाही. बदनाम करण्यासाठी षडयंत्र होते कारण मी. मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत होतो. खोटे गुन्हे दाखल केले. पक्षात राहून ते सहन केले.’ असा पाढा खडसे यांनी वाचला आहे ‘मी स्वत: राजीनामा दिला नव्हता. पक्षाने राजीनामा द्यायला सांगितला होता. ३ महिन्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असे आश्वासन देण्यात आले. मी विचारले माझा दोष काय आहे. देवेंद्रजी यांनी सांगितले की, ३ महिन्यात परत घेऊ. त्यांना विचारु शकता.’

‘कोणाला तरी लावून द्यायचे आणि आरोप करायचे हे ठरलेले गणित होते. आरोप केले की लगेच चौकशी लावायची हे सुरु होते. दाऊदसोबत संबंध आहे असे आरोप करणारे यांच्या शेजारी बसलेले असतात. हे कसे होते.’ ‘ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यांचा राजीनामा घेतला नाही. माझा काय गुन्हा आहे सांगितले का नाही मग. माझा दोष असेल तर मान्य करु.’

कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही खडसे यांच्या विरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही. या प्रकरणी अजून आरोपपत्रच दाखल झालेलं नाही तर खटला संपला कसा?.

अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

- Advertisment -

ताज्या बातम्या