Saturday, April 27, 2024
Homeनगरराष्ट्रवादीचे धूत, गाडळकर यांचे निधन

राष्ट्रवादीचे धूत, गाडळकर यांचे निधन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत व शहरजिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

- Advertisement -

धूत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते होते. पक्षातील कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असत. जिल्हा राष्ट्रवादीचा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष गाडळकर हे देखील गेल्या 15 दिवसांपासून आजारी होते.

शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहिणी, वहिनी असा मोठा परिवार आहे.

गाडळकर हे आ. संग्राम जगताप यांच्या अतिशय जवळचे व विश्वासू मित्र म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी वेळेवर पार पाडीत असे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कायम अग्रेसर भूमिका घेत असत.

मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व उत्सव नियमितपणे पार पाडत होते. सर्वांशी कायम हसत खेळत असणार्‍या गाडाळकर यांचा मोठा मित्रपरिवार आहे. सर्वांच्या अडचणीस वेळेवर मदत करणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने परिसरात व मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या