Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकइंधन दर भडकले; राष्ट्रवादीचे 'लॉलीपॉप' चर्चेत

इंधन दर भडकले; राष्ट्रवादीचे ‘लॉलीपॉप’ चर्चेत

सातपूर | प्रतिनिधी

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातपूर येथे लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

मोदी सरकार ने सत्तेत देताना अनेक आश्वासने दिली होती आणि या लॉलीपॉपची पूर्तता न करता गरीब जनतेला दरवाढीच्या आगीत ढकलणाऱ्या मोदी सरकार विरोधात लॉलीपॉप आंदोलन सातपूर येथे करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातपूर येथील मौले पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, अपूर्व हीरे हे उपस्थित होते.

यावेळी रंजन ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले. गोरगरिबांना आवश्यक असताना पेट्रोल डिझेल व गॅस, सातत्याने होत असलेली दरवाढही जनसामान्यांना जगण्यासाठी कशी न करणारी असून मोदी सरकारने सबका साथ सबका विकास ही घोषणा करताना धनदांडग्यांचा विकास आणि गरिबांची लूट चालवली असल्याचे आरोप याप्रसंगी केले.

यावेळी सातपूर परिसरातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या