Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआदिवासी विकास आयुक्तपदी नयना गुंडे

आदिवासी विकास आयुक्तपदी नयना गुंडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांची सव्वा दोन वर्षातच या पदावरून बदली झाली आहे.त्यांच्या रिक्त जागेवर गोंदीयाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची आदिवासी आयुक्त,नाशिक म्हणून नियुक्ती झाली आहे.त्या सोमवारी (दि.१९) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

- Advertisement -

राज्य शासनाने गुरूवारी (१५) राज्यातील तीन आएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.त्यात आदिवासी विभागाचे आयुक्त सोनवणे यांची बदली दुग्ध विकास विभागाच्या आयुक्त,मुंबई या पदावर नियुक्ती केली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ते आदिवासी विभागात आयुक्त म्हणून रुजू झाले होते.अवघ्या सव्वादोन वर्षातच त्यांची या विभागातून बदली झाली आहे.चिन्मय गोतमारे,मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट सिटी, नागपूर यांची जिल्हाधिकारी, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गुंडे यांचे नाशिक कनेक्शन

सोलापूरच्या कन्या नयना गुंडे या लष्करातील निवृत्त मेजर शंकरराव खांडेकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाले. १९९२ मध्ये त्या प्रशासकीय सेवेत रूजू झाल्या.गोंदीयाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची आदिवासी आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे.गुंडे यापूर्वी नाशिक मध्ये म्हाडाच्या विभागीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.त्यानंतर मुंद्राक शुल्क विभागात डीआयजी म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी या पदावरही त्यांनी काम केले आहे.सन २०१६ मध्ये आयएएस कॅडरमध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली होती.वर्धा सीईओ,यशदा या ठिकाणीही त्यांनी काम केले आहे.गोदीयांच्या जिल्हाधिकारी पदावर असतांना,त्यांची नाशिकमध्ये राज्यातील आदिवासींचे मुख्यालय असलेल्या आदिवासी आयुक्तालयात आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या