Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदहशतवाद्यांपाठोपाठ नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर

दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर

नागपूर / Nagpur – दहशतवाद्यांपाठोपाठ आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमध्ये घातपातासाठी ड्रोनचा वापर केला. आता नक्षलवाद्यांकडूनंही ड्रोनचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढलं आहे.

गडचिरोली आणि गोंदियाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. वर पहाडांवर बसून नक्षलवादी पोलीसांवर निगरानी आणि घातपातासाठी वापरतात ड्रोन वापरतात, पण जंगलात राहणार्‍या नक्षलवाद्यांना ड्रोन नेमके कुणी पुरवले? हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणार्‍यांचा पोलीस घेत आहेत शोध आहेत. आपल्या पोलीसांकडेही ड्रोन आहे. त्यासोबतच नक्षलवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी पोलीसंही आता अँटीड्रोन खरेदी करणार आहे. अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या