Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापौर वाकळेंचे व्याही नवनागापूरचे सत्ताधीश

महापौर वाकळेंचे व्याही नवनागापूरचे सत्ताधीश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. नवनागपूर ग्रामपंचायतीत महापौर बाबासाहेब वाकळेंचे व्याही दत्ता सप्रे हे डोंगरेंच्या मदतीने सत्ताधीश झाले. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

17 पैकी 13 जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. शिवसेनेचे बंडू सप्रे यांची सत्ता गेली.

बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. दत्ता सप्रे हे नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचे व्याही आहेत. व्याह्यांसाठी महापौर वाकळे हे ही मैदानात उतरले होते. तर सेनेकडून माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी या निवडणूक सक्रीय होते.

बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांनी निवडणूक एकत्र निवडणूक लढविल्याचा फायदा झाला. यामुळे त्यांच्या गटाला 13 जागा मिळाल्या. बंडू सप्रे यांना 4 जागांवरच समाधान मानावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या