Wednesday, April 24, 2024
Homeनगरनवनागापुरात घर फोडले

नवनागापुरात घर फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवनागापूरच्या गजानन कॉलनीतील आशीर्वाद अपार्टमेंटमधील घर अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी फोडले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 67 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता भास्कर खंडागळे (वय 51 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी दुपारी फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घरातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 67 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

काही वेळातच चोरी झाल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करीत आहेत. दरम्यान भरदुपारी चोरट्यांकडून घरफोड्या केल्या जात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या