पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग पिछाडीवर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa), मणिपूर (Manipur) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. लवकरच सर्व राज्यांच्या निकाल स्पष्ट होईल…

पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) पिछाडीवर आहेत. गेल्या काही महिन्यात पंजाबमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजित सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले. अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला.

त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली. काँग्रेसपेक्षा जास्त जाग पंजाबमध्ये ‘आप’ला मिळतील, असे सध्याचे चित्र आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *