Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबार२९ लाखांचा अपहार करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला चार वर्षांची शिक्षा

२९ लाखांचा अपहार करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला चार वर्षांची शिक्षा

नवापूर – Navapur – श. प्र :

तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक

- Advertisement -

इंदल महारु जाधव (बंजारा) यास चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. व्ही. जी. चव्हाण यांनी सुनावली.

नवापूर शहरातील उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याने ११ जून २०१८ रोजी उप कोषागार कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदार नवापूर यांचे खोटे देयक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सुचना पत्रकावर उपकोषागार अधिकारी नवापूर यांच्या खोट्या स्वाक्ष-या केल्या होत्या.

बॅकेचे सुचनापत्रक भारतीय स्टेट बँकेच्या नवापूर शाखेत सादर करून शासनाच्या तिजोरीतून २९ लाख रूपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले होते.

त्यामुळे इंदल जाधव हा कनिष्ठ लिपिक असून त्यास नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याच्या विरोधात अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बांनकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबत स्टेट बँक प्रशासन विरुद्धही तक्रार दिली होती.

उप कोषागार अधिकारी संजय गोविंद साळी यांना कागदपत्रांची तपासणी करीत असतांना २९ लाखांचा अपहार झाल्याचे लक्षात आले. काढलेल्या रकमेपैकी ३ लाख ६६ हजार कमी आढळून आले. उर्वरित रक्कम खाते बंद केले आहे. त्यावरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप,प्रकाश शिवनाथ बानकर अप्पर जिल्हा कोषागार अधिकारी नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने आज या खटल्याची सुनावणी केली. न्यायाधीश व्हि.जी. चव्हाण यांनी आरोपी इंद्रसिंग महारु जाधव यास चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. याबाबत सरकारी वकील चंद्रकांत पाटील यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या