Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारकेंद्रीय पेट्रोलियम पाइपलाइनचे काम बंद ठेवण्याची सूचना

केंद्रीय पेट्रोलियम पाइपलाइनचे काम बंद ठेवण्याची सूचना

नवापूर – Navapur – श.प्र :

नवापूर तालुक्यातून जाणार्‍या केंद्रीय पेट्रोलियम पाईपलाईनबाबत आज शेतकरी व इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र सहा.जिल्हाधिकारी अनुपस्थीत राहिल्याने बैठक रद्द करुन त्यांच्या उपस्थीतीत घेण्याची मागणी शेतकर्‍यांनी केल्याने बैठक रद्द करण्यात आली असुन तहसिलदार श्री. कुलकर्णी यांनी कंपनीच्या अधिकारी यांना पाईप लाईचे काम बंद ठेवण्याचे आदेश कंपनीला दिले.

नवापूर तालुक्यातून जाणार्‍या केंद्रीय पेट्रोलियम पाईपलाईनचे काम बंद करण्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी.गावीत व पदाधिकारी यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी व नवापूर पोलीस निरिक्षक यांना दि 28 ऑक्टोबर रोजी दिले.

त्या निवेदनाची दखल घेऊन तहसिलदार श्री.कुलकर्णी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संघटनेचे अध्यक्ष आर. सी.गावीत, शेतकरी व इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे अधिकारी यांची बैठक तहसिल कार्यालय नवापूर येथे सकाळी 12:30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत शेतकर्‍यांची बाजु मांडतांना आर.सी.गावीत यांनी सांगितले की, आज ची बैठक ही रद्द करुन सहा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांची तारीख घेऊन परत बैठक बोलविण्याचे सांगितले.अनेक वेळा तहसिल कार्यालया मध्ये सदर विषयी चर्चा करण्यात आलेली आहे.

पंरतु या विषयावर तालुका स्तरावर तोडगा निघत नाही, त्यामुळे नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर विषयी बैठक घेऊन चर्चा करण्यात यावे असे बदलुन गेलेल्या नवापूर तहसिलदार सुनिता जर्‍हाड यांनी शेतकर्‍यांना सांगितले होते.

त्या प्रमाणे आज बैठकीचे आयोजन झाले होते.पंरतु सहा.जिल्हाधिकारी काही कारणास्तव उपस्थित राहु शकल्या नाही.त्यामुळे जो पर्यंत जिल्हाधिकारी उपस्थित राहणार नाही तो पर्यंत बेकायदेशीर पणे सुरु असलेले पाईप लाईचे काम ताबडतोब बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली ती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी मान्य करुन लवकरच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

यावर शेतकरी व संघटनेचे पदधिकारी यांनी सांगितले की जो पर्यंत या प्रश्नी मार्ग निघत नाही तो पर्यंत उभे पिक नष्ट करुन चालु असलेले जेसीबी व इतर वाहने तोबडतोब कामावरुन काढुन घेण्यात यावे व काम बंद ठेवावे अन्यथा शेतकरी व कंपनीचे अधिकारी यांच्यात संघर्ष निर्माण होईल त्याला सर्वस्वी शासन व कंपनीचे अधिकारी जवाबदार राहीतील असे सांगितले.

त्या नंतर तहसिलदार कुलकर्णी यांनी कंपनीच्या अधिकारी यांना पाईप लाईचे काम बंद ठेवण्याचे सुचित केले व कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यांची दक्षता घेण्याचे आदेशीत केले. बैठकीला अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना पुणे शाखा नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर.सी.गावीत,भुमी जन परिवर्तन किसान मजदूर संघ नवापूर तालुका अध्यक्ष दिलीप गावित,शमुवेल गावीत,शलमोन गावीत,लाजर गावीत,विलास गावीत बंधारफळीचे राजु गावीत,करंजी बुद्रुकचे वसंत गावीत,जयंत गावीत,रमेश गावीत, गुलाबसिंग गावित सुमानजी गावित,प्रफुल गावित, जेमा गावित,वसंत गावित,जयंत गावित, छगन गावित, फत्या गावित ,प्रताप गावित,रणजीत गावीत,दिलीप गावीत,नाथु गावीत,बिटाबाई गावीत,महिमा गावीत,विनायक गावीत,विजु गावीत सह असख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी,धिरज महाजन,पोहेकॉ निजाम पाडवी,चंद्रशेखकर चौधरी यांनी चोख बदोबस्त ठेवला होता.तसेच या बाबत चे निवेदन नवापूर तालुक्याचे आ. शिरीषकुमार नाईक यांना पण शेतकर्‍यांनी दिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या