Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथे आयशर टेम्पो अन् ट्रॉलामध्ये अपघात

नवापूर येथे आयशर टेम्पो अन् ट्रॉलामध्ये अपघात

नवापूर – Navapur – श.प्र :

नवापूर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर 6 वरील श्रीरंग अवधुत साँ मील जवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रॉला यांच्यात अपघात झाला.

- Advertisement -

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील श्रीरंग अवधूत साँ मील जवळ एक वाहन नादुरुस्त होते.

आयशर टेम्पो मागच्या बाजूस उभा होता. यावेळी अवैध माती वाहुतक करणार्‍या ट्रॉलाच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॉलाला धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की या अपघातात आयशर टेम्पो च्या पुढील भाग चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

नवापूर शहरातील धान्याचे व्यापारी श्री.अग्रवाल यांच्या मालकीच्या आयशर टेम्पो चिंचपाड्याहुन धान्य भरुन नवापूरकडे येत असतांना नवरंग गेटचा जवळ एका मातीने भरलेल्या ट्रॉलाने समोरासमोर धडक दिल्याने चालक तोसिफ अली सैय्यद वय 30 रा मेमन गल्ली नवापूर याचे दोघी पाय फॅक्चर झाले आहेत. त्याला गंभीर अवस्थेत गुजरात मधील सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात होताच ट्रॉलाच्या चालक फरार झाला असून टेम्पोला क्रेन द्वारे हटवण्याचे काम सुरू होते.

या भीषण अपघातामुळे महामार्गावर दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या