Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडानावा प्रीमियर लिग सामने जाहीर

नावा प्रीमियर लिग सामने जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नावा प्रीमियर लिग (एनपीएल)’ इंटर मिडीया क्रिकेट स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्यानुसार सामने जाहीर झाले आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप आहे. येत्या 1 व 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून महात्मानगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा रंगणार आहेत.

- Advertisement -

केसिंग्टन क्लब येथे मंगळवारी (दि.14) लॉटस् पाडण्यात आले. यावेळी सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे. अ आणि ब असे दोन ग्रुप करून साखळी सामन्याप्रमाणे ड्रॉ काढण्यात आले.या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघाचे 4 सामने होतील. अ-ग्रुपचे 10 व ब-ग्रुपचे 10 असे एकूण 20 सामने रंगणार आहेत.

त्यापैकी दोन्ही ग्रुपमधील टॉप 1 च्या संघामध्ये अंतिम सामना होईल. स्पर्धेसाठी सहप्रायोजक आयवोक ऑप्टिकल अ‍ॅन्ड व्हिजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझिंग, नवांकुर पब्लिसिटी व पिंगळे पब्लिसिटी, ट्रॉफी पार्टनर मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग, टॉस पार्टनर मयुर अलंकार, तसेच लिटमस अ‍ॅकेडमी, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी मैदान उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या 16 वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जाणार आहेत.यावेळी देशदूतचे महाव्यवस्थापक अमोल घावरे, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणे, समितीप्रमुख रवि पवार, सचिन गिते व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चांडक, मोतीराम पिंगळे, दिलीप निकम, मिलिंद कोल्हे-पाटील, राजेश शेळके, गणेश नाफडे, दीपक जगताप, श्रीकांत नागरेे,अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, वृत्तपत्र प्रतिनिधी सोमेश चाटणकर, सुनिल पाटील, सोमनाथ शिंदे, टाईम्स ग्रुपचे, अभिजित गोरे, रूपेश शर्मा, बंटी पवार, प्रल्हाद इंदोलीकर, बाळासाहेब वाजे, इशहाक शेख, विजय क्षिरसागर, अतुल पाटील, शिवराज आडके, दिपक जाधव, महेश अमृतकर, सतिश रकिबे, गौरव देवळे, आदी उपस्थित होते.

असे आहेत संघ

अ-ग्रुप 1) टाईम्स ग्रुप 2) पुण्यनगरी 3) दिव्य मराठी 4) लोकमत 5) सकाळ.

ब-ग्रुप 1) देशदूत 2) लोकनामा 3) नावा 4) रेडिओ मित 5) पुढारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या