Thursday, April 25, 2024
Homeनगरगोदावरी नदीच्या नाऊर पुलानजिक अपघात

गोदावरी नदीच्या नाऊर पुलानजिक अपघात

नाऊर |वार्ताहर| Naur

वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावरील तालुक्यातील नाऊर येथील गोदावरी नदीवरील पुलालगत भरधाव वेगाने येणार्‍या क्रुझर या चारचाकी वाहनाने नाऊर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर राशिनकर (वय 49) यांना जोराची धडक देऊन वाहनचालक गाडीसह पसार झाला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले श्री. राशिनकर यांना गावातील तरुणांनी तात्काळ लोणी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर विळद घाट येथील रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

नाऊर येथील शेतकरी व शेळी-मेंढीपालक ज्ञानेश्वर राशिनकर हे नेहमीप्रमाणे सकाळी 10 ते 11 च्या सुमारास आपल्या घरच्या गायींसह गुरांना घेऊन शेतात चारण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी गोदावरी नदीवर असलेल्या पुलानजिक गावातून पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना वैजापूरकडून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळेे राशिनकर रोडच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या दोन्ही पायांना मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झाले असून डोक्याच्या खालीही गंभीर मार लागला आहे.

जखमी राशिनकर यांना गावातील पटेल व विठ्ठल भागिनाथ नांगळ या तरुणांनी रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या दुचाकीवरून त्यांना गावात आणून डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला डॉ. शिंदे यांनी दिल्यानंतर प्रथम लोणी व नंतर विळद घाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या