Friday, April 26, 2024
Homeनगरडोंगरगणच्या निसर्गाला सौंदर्‍यांला कौंदण

डोंगरगणच्या निसर्गाला सौंदर्‍यांला कौंदण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर (Nagar) शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण (Dongargan) परिसारातील सौदर्य (Beauty) सध्या पावसामुळे खुलून गेले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी (Crowd) होतांना दिसत आहे. त्याच नगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) मालकीचा असणार्‍या पिंपळगाव माळवीचा (Pimpalgav Malavi) तलाव (Pond) भरला असून सांडीवरून पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनासाठी नगरकरांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे.

- Advertisement -

नगरपासून (Nagar) अवघ्या 15 ते 16 किलो मीटरवर पिंपळगाव (Pimpalgav) , डोंगरगण (Dongargan), मांजरसुभे (Manjarsumbhe), गोरक्षनाथ गड (Goraksanath Gad)ही पर्यटन आणि धार्मिक ठिकाणे आहेत. यात पिंपळगाव (Pimpalgav Malavi) येथे महापालिकांचा (Ahmednagar Municipal Corporation) विशाल तलाव (Pond) असून हा तलाव मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने तुंडू भरला असून तलावाच्या (Pond) सांडीवरून पाणी वाहत आहे. यामुळे या भागातील सौदर्य फुलले आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्याने पर्यटक येत असून सध्या गणेशोत्सव सुरू असून रविवारी काही नगरकांनी या ठिकाणी गणपती बाप्पा विर्सजनासाठी आणले होते.

दुसरीकडे पिंपळगाव पुढे मांजरसुंभे आणि डोंगरगण गाव आहे. ही दोन्ही गावे गर्भगिरी डोंगराच्या रांगाच्या कुशीत वसलेले असून या ठिकाणी धार्मिक आणि पर्यटनाची मोठी ठिकाणे आहेत. त्याच मागील आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला असून यामुळे या भागातील धबेधबे प्रवाहीत झाले असून ते पर्यटकांना आकर्षीत करत आहेत. यामुळे या ठिकाणी नगरकरांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे. गर्भगिरी पर्वत (Garbhagiri mountain) रांगेत मांजरसुंभे गड (Manjarsumbhe Gad) आणि गोरक्षनाथ गड (Goraksanath Gad) येथे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गिर्यारोहणाचे प्रयोग सुरू आहेत.

डोंगरगणला रामेश्वर (Dongargan Rameshwar Temple) हे महादेवाचे मंदीर (Mahadev Temple) डोंगराच्या कुशीत असून त्या ठिकाणी दाट झाडी, पाण्याचे झेर यामुळे या ठिकाणी श्रावण आणि संपूर्ण पावसाळ्यात पर्यटक आणि भाविकांची गर्दी (Crowd) असते. गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी निर्सग खुलेले असून यामुळे नगरकांची दिवसभर गर्दी असल्याचे दिसत आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव तलाव, डोंगरगण आणि डोंगरातील दर्‍यात असणार्‍या धबधबे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दीत होत असून या ठिकाणी काही उत्साही पर्यटक हुलडबाजी करत असून यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हा भाग एमआयडीसी पोलीसांच्या हद्दीत येत असून त्यामुळे या ठिकाणी वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या