Wednesday, April 24, 2024
Homeनगरनैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : आ. विखे

नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : आ. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना मदत कशी मिळवून देता येईल यासाठी शासनाकडे प्रयत्न करू. करोना संकटाशी एकजुटीने लढू,

- Advertisement -

असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींपेक्षा आपल्या शिर्डी मतदार संघात कोव्हिड हॉस्पिटल व नियंत्रणासाठी चांगले काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी व निवडक कार्यकर्त्यांची बैठक काल राहाता येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आ. विखे पाटील बोलत होते. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,

राहाता पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे, गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, उपसभापती ओमेश जपे, माजी उपसभापती बबलु म्हस्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, गणेशचे संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, दीपक रोहोम, चंद्रभान बावके यांचेसह अधिकारी, कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

आमदार विखे पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती सहायता निधीसाठी एका दिवसात 35 मिमी पाऊस हवा, तो 65 मिमी नोंदला आहे. त्यामुळे हा निधी एनडीआरएफच्या फंडात बसत नाही. शेतकर्‍यांकडून पंचनाम्याची मागणी होत आहे. पण मदत मिळेल याची खात्री नाही. मात्र आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

तालुका प्रशासनाने नुकसानीचा सर्व्हे करावा, अशा सूचना त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, व गटविकास अधिकारी यांना दिल्या. मतदार संघातील नुकसानीची माहिती तयार ठेवा, आपण शासनाशी भांडू व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आपण विळद घाट, लोणी, शिर्डी येथे प्रयत्न करून कोव्हिड सेंटर सुरू केले.

यावेळी केलवडचे सुभाषराव गमे, खडकेवाके सरपंच सचिन मुरादे, चितळीचे अशोक वाघ यांनी नैसर्गिक आपत्तीचे वर्णन करत नुकसान भरपाईची मागणी मांडली. उपसभापती ओमेश जपे यांनी आभार मानले. याप्रसंगी भारत लोखंडे, पिंपळसचे सरपंच दत्तात्रय घोगळ, अस्तगावचे नंदकुमार गव्हाणे, पी. डी. गमे, विजय कोते यांचेसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या