Friday, April 26, 2024
Homeनगरभंडारदर्‍याचे निसर्ग सौंदर्य, धुक्यात हरविलेली गावे आणि आदिवासींच्या व्यथा

भंडारदर्‍याचे निसर्ग सौंदर्य, धुक्यात हरविलेली गावे आणि आदिवासींच्या व्यथा

अकोले |प्रतिनिधी| Akole

भंडारदरा पाणलोट (Bhandardara watershed) क्षेत्रात पाऊस सुरू असून भन्नाट वारा, मध्येच ऊन तर धुक्याची चादर ओढलेली गावे पाहायला मिळाली. त्यात घाटघर (Ghatghar), रतनवाडी (Ratanwadi), साम्रद (Samrad), रतनवाडी (Ratanwadi), कोल्हाट वाडी (Kolhatwadi), भिल्ल वाडी, कोलटेंभा, मुतखेल मध्ये संपूर्ण गावेच धुक्यात हरवली होती. पर्यटक (Tourists) मोठ्या प्रमाणात आली होती. धबधब्याच्या खाली यथेच्छ आनंद घेत असताना आपल्या कॅमेर्‍यात निसर्गाची छबी टिपण्याची घाई तर काही मद्यपी रस्त्यावरच आपल्या नशेचा विचार करून कार्यरत होते. भंडारदरा पाणलोट (Bhandardara watershed) क्षेत्राला अभिजात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. दरवर्षी हा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक निसर्ग प्रेमी गर्दी करतात.

- Advertisement -

भंडारदरा (Bhandardara), रतनवाडी (Ratanwadi), घाटघर (Ghatghar) येथे दोन दोन दिवस मुक्कामी राहून आपला आनंद द्विगुणित करतात. त्यासाठी ते पैशाचा विचार करत नाही. पर्यटकांमुळे येथील स्थानिक तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. काजवा महोत्सव फुलोत्सव, जलोत्सव पर्यटक साजरा करतात पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील पर्यटक येथे येत असत मात्र अलीकडे, गुजरात, कर्नाटक राज्यातून व परदेशातूनही पर्यटक येथे हजेरी लावू लागले आहे. नेकलेस फॉल (Necklace Fall), नाणी फॉल (Nani Fall), रंधा फॉल (Randha Fall), बाहूबली (Bahubali), सह्याद्री या फॉल वर मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र मद्यपी पर्यटक सुंदर अशा या निसर्ग अविष्काराला गालबोट लावत आहे. आतापर्यंत वीस तरुणांवर गुन्हे दाखल करून ते सुधारतं नाही. तर स्थानिक नेते त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत ही शोकांतिका आहे.

तालुक्यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. येथील आदिवासी माणसांना खावटी अद्याप मिळाली नाही.याबाबत आदिवासी शेतकरी (Tribal farmers) तुकाराम बांडे बाबा म्हणाले. दरवर्षी आम्हाला अतिवृष्टीचा सामना करावा लागतो त्यात आमची जनावरे थंडीने मरतात मात्र लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत. दोन वर्षे लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता आले नाही स्थानिक ठिकाणी विहिरीच्या कामावर मजुरी करून बियाणे खते आणले. पाऊस मध्ये उघडला असल्याने आम्ही चिंतेत होतो. ही चिंता दूर झाली. समाधानकारक पाऊस पडत आहे.

दरवर्षी अतिवृष्टी होते. ती झाली की पिचड साहेबांचा निरोप यायचा, मी तुम्हाला भेटायला येतो. ते आल्यावर जिल्ह्याचे अधिकारी सोबत असायचे मग जनावरांना चारा, खावटी धान्य, मृत जनावरांचे पंचनामे व त्वरीत मदत मिळत असे. त्यामुळे ते आजही आमचे आधारवड आहेत. त्यांची मदत घरपोहच मिळत असे. आज साहेबांचे वय झाले. नवीन आमदार निवडून आले, मात्र आदिवासी मेला की जगला हे पहायला दोन वर्षे या भागात फिरकले नाही. मात्र आम्ही जरी उपाशी असलो तरी स्वाभिमानी आहोत. येणार्‍या संकटाला सामोरे जाण्याची जिद्द आहे. आम्ही दुःखी आहोत पण तरीही सुखी आहे.

– तुकाराम बांडे, आदिवासी शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या