Friday, April 26, 2024
Homeनगरदेशव्यापी संपाला झेडपी लिपिक संघटनेचा पाठिंबा

देशव्यापी संपाला झेडपी लिपिक संघटनेचा पाठिंबा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी पुकारलेल्या आजच्या (दि.26) लाक्षणिक संपाला

- Advertisement -

राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसले तरी या संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत या मागणीसाठी संपाला पाठिंबा असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, राज्य सचिव अरुण जोर्वेकर यांनी सांगितले.

बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कर्मचार्‍यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 वर्षे करण्याची शिफारस अहवालात केली आहे. परंतु, सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षेच ठेवावे तसेच जे कर्मचारी वयाचे 33 ते 45 व्या वर्षी सेवेत रूजू झालेत फक्त त्यांच्यासाठी एकूण सेवा 30 वर्षे किंवा वय वर्षे 60 यापैकी जे आधी असेल तो सेवानिवृत्त दिनांक ग्राह्य धरावा.

लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून असलेल्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी, कर्मचारी भरती करावी, पदोन्नतीतील आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, कंत्राटीकरण रद्द करावे, प्रलंबित देयकांसाठी अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी होणार्‍या लाक्षणिक संपाला संघटनेचा पाठिंबा आहे. यादिवशी लिपिकवर्गीय कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवणार नाहीत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने करून कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे.

संपाच्या पाठिंबा पत्रावर कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष पंकज गुल्हाणे, राज्य समन्वयक सागर बाबर, कार्याध्यक्ष सचिन मगर आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या