Friday, April 26, 2024
Homeजळगावकेंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे उद्या देशव्यापी कॉल अटेन्शन दिन

केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे उद्या देशव्यापी कॉल अटेन्शन दिन

भुसावळ – प्रतिनिधी Bhusawal

देशातील १० प्रमुख केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे व रेल्वे, संरक्षण, बिमा, इन्कम टैक्स, बैंक, टपाल, अन्य केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महासंघाद्वारे स्थापित एनजेसीए (नॅशनल जॉईंट कॉन्सील फॉर एक्शन) द्वारा देशव्यापी १ दिवसीय कॉल अटेन्शन डे पाळण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारद्वारे सादर करण्यात येणार्‍या बजेट मधील देशातील रेल्वे, संरक्षण आदिंचे सरकारद्वारा निगमिकरण करण्याचे प्रस्ताव रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी येथील आयुध निर्माणी गटे समोर १ रोजी सकाळी निदर्शने करण्यात येणार अहे.

- Advertisement -

केंद्रीय कर्मचारी महासंघद्वारे व एनजेसीचे निर्देश व संरक्षण क्षेत्रातील तीन्ही फेडरेशनच्या संयुक्त समितीद्वारे निर्देशित देशव्यापी १ दिवसीय ‘कॉल अटेन्शन डे’ साजरा करण्यात येणार आहे. सर्व कर्मचारी सकाळी मुख्य गेटवर जमुन निदर्शने करतील व संरक्षणचे निगमिकरण प्रस्ताव रद्द करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. संरक्षणमध्ये कार्यरत आयडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएसचे संयुक्त राष्ट्रीय समितीच्या आदेशा नुसार हा कार्यक्रम होणार असुन प्रशासनास आवश्यक माहिती व पाठपुरावा केला असुन सर्व कामगारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक संयुक्त समितीचे संयोजक दिनेश राजगिरे यांनी केले आहे.

अशा आहेत मागण्या

निगमीकरणाचे प्रस्ताव रद्द करणे, जानेवारी २००४ पासुन लागू नवी पेन्शन रद्द करणे, ७ वे वेतन आयोगातील त्रुटी दुर करणे, संरक्षण विभागात १०० टक्के अनुकंपा भरती करणे, रिक्त जागा भरणे, अन्य १३ सुत्री मागण्या असल्याने संरक्षण मधिल अग्रणी ऑल इंडिया डिफेंन्स एम्लॉईज फेडरेशन समेत इंटक व बिपीएमएस सहभागी होणार असल्याची माहिती आयडीईएफचे उपाध्यक्ष व कामगार नेते राजेंद्र झा यांनी दिलीे.

- Advertisment -

ताज्या बातम्या