Thursday, May 2, 2024
Homeनाशिककाँग्रेसतर्फे 'आझादी गौरव पदयात्रेचे' आयोजन

काँग्रेसतर्फे ‘आझादी गौरव पदयात्रेचे’ आयोजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय काँग्रेसच्या ( Congress Party )वतीने ९ ते १५ आ‍ॅ‍ॅगस्ट दरम्यान देशव्यापी “आझादी गौरव पदयात्रेचे” ( Aazadi Gaurav Padyatra0 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister Balasaheb Thorat)यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

- Advertisement -

यावेळी माजी शहराध्यक्ष शरद आहेर,राजाराम पानगव्हाणे ,माजी आमदार डॉ.शोभा बच्छाव,माजी नगरसेविका डॉ.हेमलता पाटील,माजी नगरसेवक राहुल दिवे उपस्थित होते. यावेळी बोलतांना बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्रपूर्व काळापासून आत्तापर्यंत काँग्रेसचे देशाबद्दल योगदानाबाबत माहिती दिली.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि,देशाच्या वाटचालीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. यू पी ए च्या कार्यकाळातील दहा वर्षात खूप चांगले निर्णय घेण्यात आले. सध्याची राजवट देशात दहशत निर्माण करणारी असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारची जिवनावश्यक वस्तूंवर कर लावण्याइतकी मजल गेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जिवन जगणे कठीण झाले आहे.

सध्या राज्यघटनेचे अस्तित्व मिटते कि काय असा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी पूर्वीचा इतिहास आपण सांगणे व आत्ताच्या परिस्थितीची जाणीव जनतेला करून देणे याकरिता देशातील सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांत आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पदयात्रेचा समारोप नगर येथील भोईकोट किल्ला येथे होणार आहे कारण पंडितजींनी याठिकाणी तिन वर्षे तुरुंगवास भोगला आहे आणि याच ठिकाणी त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

यावेळी काँग्रेस बद्दल बोलतांना त्यांनी सांगितले कि काँग्रेस हा पक्ष नसून एक विचारधारा आहे. ज्याचा स्वातंत्रसंग्रामात सहभाग राहिला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र चळवळीत सहभाग नसल्याचे वक्तव्यही केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या