Friday, April 26, 2024
Homeनाशिककेंद्र, राज्य शासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

केंद्र, राज्य शासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

सटाणा । प्रतिनिधी | Satana

कांद्याला अनुदान (Subsidy to onion) द्यावे, पिकांचे पंचनामे (panchanama) करत शेतकर्‍यांना (farmers) त्वरीत नुकसान भरपाई (compensation for damages) मिळावी, लंपीग्रस्त (Lumpy) जनावरांना मोफत लस (free vaccination) द्यावी तसेच

- Advertisement -

गुजरातची (gujrat) गुलामगिरी बंद करावी आदी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज शहर-तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन (agitation) छेडले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलकांनी महामार्ग परिसर दणाणून सोडला होता.

सकाळी 11 वाजता सटाणा बसस्थानकाजवळ (Satana Bus Stand) राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊन सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन (agitation) करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बंद करा बंद करा गुजरातची गुलामगिरी बंद करा, कांद्याला अनुदान मिळालेच पाहिजे, गुजरात (gujrat) तुपाशी महाराष्ट्र (maharashtra) उपाशी अशा घोषणा देत राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.

यावेळी बोलताना माजी आ. संजय चव्हाण यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत द्यावी.

केंद्र शासनाच्या (central government) शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किफायतशीर भाव मिळत नसून मातीमोल भावाने शेतीमाल विकावा लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात लाखो कोटींचा उद्योग सुरू करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प (Vedanta Foxcorn Project) महाराष्ट्र सोडून गुजरातला जाणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा आरोप चव्हाण यांनी शेवटी बोलतांना केला. यावेळी संजय शिरसमणीकर, जिभाऊ खंडू सोनवणे, प्रशांत चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना आंदोलकांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, कवडीमोल भावाने विकल्या जाणार्‍या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला चालना देऊन कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करावे,

लंपी आजारामुळे शेतकर्‍यांची गुरे मरत असून त्यांना सरकारने नुकसान भरपाई देण्याबरोबरच बाधित जनावरांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी माजी आ. दीपिका चव्हाण, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, डॉ. विठ्ठल येवलेकर, वंदना भामरे, ज.ल. सोनवणे, नितीन भामरे, जे.के. सोनवणे, शहराध्यक्ष सुमित वाघ, मनोज सोनवणे, रितेश जाधव, रत्नाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, अनिल चव्हाण, उपाध्यक्ष भारत खैरनार, पंचायत समिती माजी उपसभापती वसंत भामरे, साहेबराव सोनवणे, हरिभाऊ रौंदळ, अरुण सोनवणे, पोपटराव सोनवणे, केशव सोनवणे,

सुनिल सोनवणे, बाजार समितीचे माजी केशव मांडवडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. रेखा शिंदे आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. पो.नि. सुभाष अनमुलवार, सपोनि किरण पाटील, वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या