Monday, April 29, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार

नगर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

युवक बिरादरी भारत यांच्यावतीने देशात राष्ट्रीय पुरस्कारासाठी घेतलेल्या लेखी व तोंडी परीक्षेतील गुणवत्तेवर अहमदनगर जिल्ह्यातील

- Advertisement -

5 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून सदरच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये व प्रशस्तीपत्रके मिळणार आहेत.

जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा भूषण पुरस्काराचे मानकरी आस्था कैलास चौधरी, सार्थक कोकणे- केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल श्रीरामपूर, सत्यम विजय जाधव- दादासाहेब घाडगे पाटील कॉलेज नेवासा, ज्ञानेश्वर अशोक जंगले- आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, प्रसाद अनिल पवार- ओम गुरुदेव कॉलेज कोकमठाण आदी विद्यार्थी मानकरी ठरले आहेत. सदरच्या विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी सोहेल शेख, शिक्षक बाळासाहेब साबळे, पिंकी ठक्कर, विलास मांढरे आदींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले

या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन 150 गुणांची लेखी परीक्षा पात्र होऊन पुन्हा तज्ञ व्यक्तीसमोर मुलाखत दिली. देशातून गुणवत्तेनुसार 28 जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली त्यात आपल्या एकमेव जिल्ह्याचे 5 मानकरी ठरले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे युवक बिरादरी संस्थापक पद्मश्री क्रांतिभाई शहा, चेअरमन अभिषेक बच्चन, अध्यक्ष आशुतोष शिर्के, संयोजक स्वरा शहा, सुनील वालावलकर, प्रशिक्षक पंकज इंगोले, अमेय पाटील, प्रसन्ना शिंदे, जिल्हा संचालक सुनील साळवे, जिल्हाध्यक्ष के. के. आव्हाड, उपाध्यक्ष प्रमोद पत्की, चेतन लोखंडे, सचिव संतोष जाधव, संघटक अजय घोगरे, जिल्हा संस्थापक संजय जोशी, भरत कुंकूलोळ, साहेबराव घाडगे, दादासाहेब साठे, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके, बाळासाहेब सोनटक्के, सुरंजन साळवे, राजेंद्र केदारी, पराग कारखानीस, साहेबराव रक्ताते, प्रताप भोसले, अनिल जाधव, संतोष जाधव, उल्हास मराठे, बाळासाहेब पाटोळे, प्रदीप गायकवाड, डॉ. प्रतिभा विखे, अपूर्वा वराळे, प्रो. सुप्रिया साळवे, सविता साळुंके, शोभा शेंडगे, सुजय उपाध्ये, सुरेश वाघुले, प्रकाश जाधव आदींनी कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या