Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशNTA Exams: JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी होणार...

NTA Exams: JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी होणार परिक्षा, पहा वेळापत्रक

मुंबई | Mumbai

नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४-२५ साठी हे वेळापत्रक असणार असून जेईई नीट, आणि सीयुईटी यांसारख्या महत्वाच्या परिक्षांचा यात समावेश आहे. या परिक्षांची कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा ११ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे.

- Advertisement -

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, एनटीएने एका एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन १ (JEE Main) हे २४ जानेवारी २०२४ ते १ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान होणार आहे. तर जेईई मेन सेशन २ हे १ एप्रिल २०२४ ते १५ एप्रिल २०२४ या दरम्यान पार पडेल. या दोन्ही परीक्षा सीबीटी (कम्प्युटर बेस्ड टेस्ट) या पद्धतीने होणार आहेत.

युजीसी-नेट ची पहिल्या सत्रातील परीक्षा १० जून आणि २१ जून दरम्यान होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे. तर, कॉमन युनिवर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) याची यूजी आणि पीजी परीक्षा ही वेगवेगळी घेण्यात येणार आहे. CUET-UG ही परीक्षा १५ मे ते ३१ मे २०२४ दरम्यान पार पडेल. तर, CUET-PG ही परीक्षा ११ ते २८ मार्च दरम्यान पार पडेल. या परीक्षा देखील CBT पद्धतीने घेतल्या जातील.

निकाल कधी?

यूजीसी चेअरमन एम. जगदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार; CUET PG, UG आणि NET परीक्षांचे निकाल हे शेवटचा पेपर झाल्यानंतर तीन आठवड्यांमध्ये लागणार आहेत. तर, परीक्षांच्या नेमक्या तारखा आणि इतर माहिती विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या