Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेशसेवा हिच खरी सर्वोत्कृष्ट सेवा : आ. बनकर

देशसेवा हिच खरी सर्वोत्कृष्ट सेवा : आ. बनकर

निफाड। प्रतिनिधी | Niphad

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भारतीय सीमा सुरक्षा दलात (Indian Border Security Force) 27 वर्षे देशाची सेवा (Service to the country) करणे हे अवघड काम असून ते या भूमितील राजेंद्र आव्हाड यांनी केले आहे. देशसेवा हीच खरी सर्वोत्कृष्ट सेवा असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी केले आहे.

- Advertisement -

सीमा सुरक्षा बल (Border Security Force) अर्थात बीएसएफच्या (BSF) सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल राजेंद्र आव्हाड यांचा म्हाळसाकोरे (Mhalasakore) येथील म्हाळसादेवी मंदिरासमोर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. बनकर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे (V.N. President of Naik Sanstha Pandharinath Thore) होते. यावेळी मा.जि.प. उपाध्यक्ष दिगंबर गिते, जि.प. सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी सुनीता राजोळे,

ओबीसी मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख जगन कुटे, डॉ.प्रल्हाद डेर्ले, अपंग कर्मचारी संघटनेचे बाळासाहेब सोनवणे, नंदु सांगळे, गुरूदेव कांदे, दौलत मुरकुटे, भास्कर सोनवणे, गणपत हाडपे उपस्थित होते. यावेळी जवान राजेंद्र व वीर पत्नी शोभा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. बनकर म्हणाले की, राजेंद्रने 27 वर्ष देशाची प्रामाणिक सेवा केली.

आता यापुढे गावातील तरुणांच्या तसेच मुलांच्या मनात देशसेवा करण्याची उर्मी जागृत करुन त्यांना मार्गदर्शन करावे असेही आ. बनकर म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोकुळ गीते, पंडीत सोनवणे, सूर्यभान बोडके, बाळासाहेब मुरकुटे, सखाराम हाडपे, छबू हाडपे, दत्तु मुरकूटे, संजय बोडके, वसंत सोनवणे,

प्रकाश बाजारे, शिवनाथ सोनवणे, वामन आव्हाड, शशिकांत आव्हाड, ज्योती कदम, शांताराम आव्हाड, गोरख आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, संध्या महाले, जगन डोकफोडे, दत्तु बाजारे, ज्ञानेश्वर सोनवणे, ज्ञानेश्वर बागल, सोमनाथ शिंदे, मोहन सांगळे, तेजस आव्हाड, संकेत आव्हाड, दर्शन आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी सकाळी 9 वाजता के.पा. नगर येथील योगेश आव्हाड यांचे हरिकिर्तन संपन्न झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या