Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedरात्री दहानंतर मशिदीचे भोंगे वाजले तर काढून फेकणार - करणी सेनेचा इशारा

रात्री दहानंतर मशिदीचे भोंगे वाजले तर काढून फेकणार – करणी सेनेचा इशारा

औरंगाबाद – aurangabad

रात्री दहा वाजेनंतर मशिदीवरील भोंगे वाजले तर त्यांना (Karni Sena) करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून फेकून द्यावे, अशी घोषणा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह (National President Surajpal Singh) अम्मू यांनी केली आहे. न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. संविधानानुसार देश चालवित असून उच्च न्यायालय त्याचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

(mgm) एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी (१० एप्रिल) आयोजित करणी सेनेच्या महासंमेलनात त्यांनी पोलिस हटवा म्हणणाऱ्या ओवेसींचा समाचार घेताना पाच मिनिटे देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसीला पाकिस्तान सीमेवर सोडतो, असे उद्गार काढले. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देविचंदसिंह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, शिवचैतन्य महाराज, आमदार उदयसिंग राजपूत, करणी सेनेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा राखी गर्ग, प्रदेशच्या अॅड. संध्या राजपूत, बादलसिंग तवर, अमिता शेखावत, पंकजसिंह ठाकूर, बाबा ठाकूर, बाबा परदेशी, मधुकर ढोमसे, सुभाष राठौर, दिनेश राजपूत आदींची उपस्थिती होती.

सूरजपालसिंह अम्मू म्हणाले, रस्ते मनुष्याला चालण्यासाठी आहेत. रस्त्यांवर नमाज पठण केली, तर आम्ही हनुमान चालिसा सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला. करणी सेना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावरील हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्याचे त्यांनी म्हटले. सूत्रसंचालन अॅड. आनंदसिंह बायस यांनी केले. संमेलनात गायक अमरसिंह रघुवंशी व गायिका संध्या मिश्रा यांचाही सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या