Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकफार्मसी महाविद्यालया कडून राष्ट्रीय स्तरावर वेबिनार

फार्मसी महाविद्यालया कडून राष्ट्रीय स्तरावर वेबिनार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

ब्रह्मा व्हॅली फार्मसी महाविद्यालयाकडून राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार मार्फत “बी. फार्म. प्रॅक्टिस स्कूल” साठी पाचशेहून अधिक प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रीय नवीन शैक्षणिकधोरण 2020 व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी. सी. आय.) यांच्या नव्या धोरणा प्रमाणे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अंतर्गत समाविष्ट झालेले आहे, अशा महाविद्यालयांना अंतिम वर्ष सातव्या आणि आठव्या सेमेस्टरसाठी अनुप्रमाणे “बी. फार्म. प्रॅक्टिस स्कूल” आणि “प्रोजेक्ट वर्क” अनिवार्य करण्यात आले आहे.

बऱ्याच शिक्षकांना नेमके काय करायचे ? यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. यासाठी ब्रह्मा व्हॅली फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाघ, समन्वयक प्रा. प्रदीप देशमुख व उप समन्वयक प्रा. रोहित माळी व डॉ. अमित गंगवाल प्राचार्य फार्मसी महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(दि.९)”लाईव्ह वेबिनार” घेण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध महाविद्यालयातील पाचशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. हा वेबिनार प्रामुख्याने फार्मसी क्षेत्रातील भूतकाळातील घडामोडी, वर्तमानातील बदल आणि भविष्यात येऊ पाहणाऱ्या सर्वच बाबींचा ऊहापोह करणारा होता.

डॉ. विजय वाघ यांनी मार्गदर्शनात समाविष्ट झालेल्या नवीन बाजू मांडल्या. तसेच शिक्षकांनी प्राध्यापकांनी आणि प्राचार्यांनी कसे समन्वय साधून मुलांना अंतिम वर्षातील प्रोजेक्टसाठी त्रिसूत्री आखणी मांडावी याबद्दल फार्मसुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी आणि फार्मकोलॉजी या विभागांमध्ये कशाप्रकारे विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांची मार्गदर्शन करण्यासाठी विविध कल्पना व योजना कशा आखाव्या याबद्दल मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय स्तरावरील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. बर्याच प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रशानंतर, कोविड-१९ लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांनी करण्याजोग्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या केलेल्या प्रयत्नांसाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, सचिव गौरव पानगव्हाणे यांनी कौतुक केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरून होणाऱ्या मागणीसाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या