Sunday, April 28, 2024
Homeनाशिकनॅशनल इन्स्टिट्युशनल रॅकिंग फ्रेमवर्क क्रमवारी जाहीर; एसएनजेबी फार्मसीला मानांकन

नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅकिंग फ्रेमवर्क क्रमवारी जाहीर; एसएनजेबी फार्मसीला मानांकन

चांदवड । प्रतिनिधी | Chandwad

राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन (Evaluation of Educational Institutions) करणार्‍या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची (National Institutional Ranking Framework) क्रमवारी जाहीर झाली असून चांदवड (chandwad) येथील

- Advertisement -

एसएनजेबी संस्थेच्या (SNJB Institute) श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीने (Mr. Sureshdada Jain College of Pharmacy) शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework) क्रमवारीत देशभरातील महाविद्यालयांतून टॉप 102-125 फार्मसी महाविद्यालयांमध्ये स्थान पटकावले आहे. केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी शुक्रवारी ही क्रमवारी जाहीर केली आहे.

रँकिंग फ्रेमवर्क हे शिक्षण, शिक्षण (education) आणि संसाधने, संशोधन (Research) आणि व्यावसायिक सराव, ग्रॅज्युएशन आउटकम, आउटरीच, समावेश आणि परसेप्शनच्या पॅरामीटर्सच्या पाच व्यापक सामान्य गटांच्या अंतर्गत संस्थांचे रँकिंग करण्यात येते. पॅरामीटर्सच्या या पाच गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या संख्यांच्या बेरजेवर आधारित रँक दिल्या जातात.

गेल्या काही वर्षात फार्मसी महाविद्यालयाने (Colleges of Pharmacy) अनेक मोठे प्रकल्प राबविले असून सरकारी यंत्रणा व सार्वजनिक तसेच खाजगी उद्योगांना मार्गदर्शन सेवा देखील प्रदान केली आहे. संस्थेचे सामर्थ्य अत्याधुनिक संशोधनाव्यतिरिक्त तिच्या दर्जेदार प्राध्यापकांमध्ये, संशोधन विद्वानांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने अनेक नवीन संकल्पना देखील नियमीतपणे राबविल्या आहेत.

महाविद्यालयास यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2020 मध्ये ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय म्हणून सन्मानित करण्यात आले होते तसेच मानांकन देखील मिळाले आहे. या मानांकनामुळे संपूर्ण चांदवड तालुक्याचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागातील संस्थांचे वाढते यश निश्चितच समाधानकारक आहे.

संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समिती चेअरमन अजितकुमार सुराणा, व्हा. चेअरमन अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, महाविद्यालयाचे समन्वयक अ‍ॅड. प्रकाश बोकाडिया, प्राचार्य डॉ. सी.डी. उपासनी तसेच सर्व विभागप्रमुख व कर्मचार्‍यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून पुढील वर्षी रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये येण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आमच्या संस्थेला रँकिंगमध्ये भारतातील फार्मसी महाविद्यालयांच्या टॉप 102-125 मध्ये स्थान मिळाले, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देऊन सक्षम करण्याचे ध्येय पूर्ण करण्यास निश्चित मदत होईल.

– बेबीलाल संचेती , अध्यक्ष, विश्वस्त समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या