Friday, April 26, 2024
Homeनगरराष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीसाठी भीक मागो आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीसाठी भीक मागो आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 या रास्त्यावरील खड्डे त्वरित बुजून उडणार्‍या धुळीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून या धुळीवर कायमचा उपाय करावी अन्यथा येत्या मंगळवारी (दि.23) भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा शहरातील नागरिकांनी दिला आहे.

- Advertisement -

याबाबत पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.61 वर पाथर्डी शहरातील राहणारे नागरीक रस्त्याच्या कामामुळे व त्यांच्या होणार्‍या दिरंगाईमुळे वैतागलेे आहेत. या त्रासामुळे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. रस्ता ज्या वेळी करायचा त्यावेळी करा पण त्यावरचे खडडे व धुळीमुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे.

धुळीचे प्रचंड लोट आमच्या घरा दारात व व्यवसायीक ठिकाणी येत असल्याने आमचे जगणे मुश्कील झाले आहे.आपल्या कार्यालयावर वेगवेगळया कार्यकत्यांनी व सामाजिक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण त्याला आपले कार्यालय दाद देत नाही. महामार्गाची तातडीने दुरूस्ती न केल्यास राष्ट्रीय महामार्गच्या विरोधात भिक मागो आंदोलन करुन त्यातुन मिळालेला निधी या रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात येईल.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, अशोक सोनटक्के, नितीन मोरे, जालिंदर बोरुडे, शंकर बोरुडे, मुबीन शेख, कारभारी मोरे, विशाल दहिफळे, संतोष थोरात, कल्याण घुले, धनंजय बांगर, संदीप हांगे, सावता सोनटक्के आदींच्या सह्या आहेत.

धुळमुक्तीला प्राधान्य द्या

राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रामुख्याने पाथर्डी शहरातील कोरडगाव रोडवरील लक्ष्मी आई मंदिर ते विजय लॉन्स हा रस्ता तातडीने खडडे मुक्त व धुळ मुक्त करावा. प्रचंड प्रमाणात धुळ उठत असल्या कारणाने त्याच्यावर तातडीने ठेकेदाराला पाणी मारण्याच्या सुचना करण्यात याव्यात व खड्डे तातडीने भरण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या