Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ‘इतक्या’ राष्ट्रध्वजांचे झाले वितरण

जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ‘इतक्या’ राष्ट्रध्वजांचे झाले वितरण

जळगाव – jalgaon

जळगाव महानगरपालिका (Jalgaon Municipal Corporation) व जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका (Municipality) क्षेत्रात घरांची संख्या 2 लाख 85 हजार 235 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 6 लाख 80 हजार 156 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 7 लाख 65 हजार 727 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 99 हजार 664 लाख राष्ट्रध्वजापैकी 1 लाख 75 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत आहेत.

- Advertisement -

धुळे जिल्ह्यात 3 लाख 83 हजार 503 राष्ट्रध्वजांचे वितरण

धुळे महानगरपालिका (Dhule Municipal Corporation) व धुळे जिल्ह्यातील नगरपालिका (Municipality) क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 8 हजार 914 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 2 लाख 93 हजार 205 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 2 लाख 73 हजार 503 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 28 हजार 616 लाख राष्ट्रध्वजापैकी 1 लाख 10 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात 3 लाख 80 हजार 187 राष्ट्रध्वजांचे वितरण

नंदूरबार नगरपालिका (Municipality) क्षेत्रात घरांची संख्या 46 हजार 284 असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 3 लाख 32 हजार 903 इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर 3 लाख 60 हजार 187 राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 19 हजार राष्ट्रध्वज पुरविण्याची मागणी होती. 20 हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

4 तास फडकणार तिरंगा

भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर, 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज घरावर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये घरावर राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या