Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : घरांवर डौलाने फडकला 'तिरंगा'

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : घरांवर डौलाने फडकला ‘तिरंगा’

पिंगळवाडे | Pingalwade

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे . याच अनुषंगाने पिंगळवाडे गावात सुद्धा हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) दिसत आहेत. साधारण हजाराच्या पुढे लोक वस्ती असलेल्या पिंगळवाडे गावात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकत आहे….

- Advertisement -

तसेच नागरिक सुद्धा या तिरंगा (Tiranga) ध्वजाचे सन्मान पूर्वक जतन करत आहेत. विशेष बाब म्हणजे पिंगळवाडे गावातील बहुतांशी नागरिक मळ्यात किंवा वाडी वस्त्यांवर वास्तव्यास आहेत तरी सुद्धा राष्ट्रप्रेमाचे प्रतीक राष्ट्रध्वज (National Flag) आपापल्या राहत्या घरी मोठ्या डौलाने नागरिकांनी लावले आहेत.

Live : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे देशवासियांना संबोधन, पाहा व्हिडीओ…

ग्रामपंचायतीमार्फत (Grampanchayat) राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा प्रांगणात सुद्धा ठीकठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हर घर तिरंगा दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या