Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन(Nashik District Fencing Association,), डी. एस. फ. या च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे मिनी गटाच्या ११ व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे (fencing competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

- Advertisement -

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (Indian Olympic Association) सरचिटणीस आणि फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील (Sports Deputy Director Sunanda Patil) यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, फेन्सिंग फेडेरेशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, फेडेरेशनचे सदस्य नागेश्वर राव, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, या स्पर्धेचे संचालक तुकाराम आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये भारतातील २७ राज्यांच्या ७८२ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला.

यावेळी बोलतांना सुनंदा पाटील यांनी सांगितले की या बालवयापासूनच मुलांना अश्या राज्य, राष्ट्रीय स्पर्ध्याचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांना या स्पर्धेचा फार चांगला फायदा होतो, आणि यामधूनच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाडू तयार होतात. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजकांचे खरे कौतुक करणे आवश्यक आहे असे सांगितले. यावेळी अविनाश टिळे, डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे यांनीही मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्या दिल्या.

उदघाटनानंतर स्पर्धांना सुरवात करण्यात आली यामध्ये १० वर्षे मुलीच्या सॅबर प्रकारात उत्तराखंडच्या प्रहम्या कोठारीने अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या श्रेया मुमला १५-०७ असे पराभूत करून या प्रकारात विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या श्रेया मुमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर उपांत्य लढतीत पराभूत झालेल्या महाराष्ट्राच्या अनया वरखडे आणि तमिळनाडूच्या अनुश्री यांना सयुंक्त तिसरा क्रमांक मिळाला.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रकाश काटुळे, डॉ. पांडुरंग रणमाळ, राजकुमार सोमवंशी, दत्ता पाटील, राजू शिंदे, अशोक कदम, दिपक पाटील, उदय खरे, दिपक निकम आदींची कमिटी कार्यरत आहे.

तसेच या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी अविनाश वाघ, राहुल फाडोल, अनिल गायकवाड, योगेश पाटील, अमोल आहेर, ज्योती निकम मनिषा काठे आदी प्रयत्नशील आहेत.

आजच्या स्पर्धेचे निकाल

सेबर प्रकार

१० वर्ष – मुली:१) प्रहाम्या कोठारी (उत्तराखंड) – प्रथम

२) श्रेया मूम (महाराष्ट्र) द्वितीय

३) अनुष्री (तामिळनाडू) आणि अनाया वरखडे(महाराष्ट्र)संयुक्त तिसरा क्रमांक.

- Advertisment -

ताज्या बातम्या