Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रीय अभियंता दिन : विकासाचे भगीरथ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

राष्ट्रीय अभियंता दिन : विकासाचे भगीरथ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतात अभियंता दिन Engineer’s Day 15 सप्टेंबरला म्हणजेच आज साजरा होतो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या Sir Mokshagundam Visvesvaraya यांचा जन्मदिवस. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

- Advertisement -

नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर त्यांंना सेवेत दाखल करुन घेतले होते. म्हणूनच या अभियंता दिनाला नाशिक मध्ये विशेष महत्व आहे.त्यानिमित्ताने अभियंत्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेेऊन नाशिकच्या विकासात घातलेल्या भरभराटीचा हा पुरावा.

त्यांनी उभारलेले काही प्रकल्प कायम संस्मरणीय राहिले. त्यात स्वातंंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भगीरथ म्हणून ओळखले जाते. अशा या महान व्यक्तामत्वाचा आदर्श घेऊन नाशिक जिल्ह्यातील अभियंत्यांनी जिल्ह्याच्या विकासात मोठी भर घातली आहे. त्यात सात मोठे व सतरा मध्यम धरणांचा समवेश आहे. त्यामुळे जिल्हा समृध्द होण्यास मदत झाली आहे. शंभर वर्षापासून पुलांची उभारणी सातत्याने नाशिक मध्ये होत आहे. आशिया खंंडातील सर्वात मोठा उड्डाणपूल उभारुन नाशिकने आघाडी घेतली आहे.

अमेरिकेतील बिल्डिंग मॅनेजमेंट नाशिकला

अमेरिकेतील इमारतींच्या पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करण्याची यंत्रणा नाशिकमधून केली जात असून, यासाठी नाशिकच्या 250 सिव्हिल इंजिनिअर्सच्या माध्यमातून काम केले जात आहे. महात्मानगर भागात प्रोथ्यूस नावाने उद्योग बिल्डिंग इन्फरमेशन मॅनेजमेंट या प्रणालीवर कार्यरत आहे. कॅडकॅम पध्दतीच्या माध्यमातून अमेरिकेतील इमारतींच्या विविध यंत्रणांचे नियोजन याठिकाणी केले जाते.

प्रामुख्याने अमेरिकेतील इमारतींचे बांधकाम, आर्किटेक्चर, स्ट्रक्चरल डिझाईन तयार केले जाते. त्यांच्या परस्परांतील अडथळे या ठिकाणी तपासले जातात. तसेच इमारतीच्या उभारणी सोबतच उपलब्ध केल्या जाणार्‍या इलेक्ट्रिकल यंत्रणा, पाणीपुरवठा यंत्रणा यांच्या आरेखनाचे नियोजन कसे असावे याबाबत प्रोथ्यूसच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे इमारतीत या सर्व यंत्रणा सुरळीत व परस्परांना कोणतीही अडचण निर्माण न करता कार्यरत राहण्यासाठी सोयीचे होते.

प्रोथ्यूसच्या प्रणालीमुळे बांधकामातील त्रुटी देखील समोर येत असून, त्या निर्दोष करण्यास मदत होते. यासोबतच खर्चातही बचत होत असते. या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारी सामुग्रीही वाचण्यात त्याचा उपयोग होतो.

दरवर्षी 17 हजार इंजिनिअर

नुसत्या नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी साधारण 16 ते सतरा हजार विद्यार्थी इंजिनियरिंगच शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेने जॉब आणि तेही त्यांच्या क्षमताना ओळखून योग्य पगार, संधी देणारे विद्यार्थ्यांच्या मानाने कमी आहेत. काही ठिकाणी इंजिनियरिंग कॉलेजच्या नावाखाली नुसते डिग्री मिळवून देणारे महाविद्यालय सुध्दा आहेत. आणि असेही उद्योग धंदे आहेत जे मार्केटमधून तितक उत्पन्न नाही म्हणून अनेक उत्तम अभियंत्यांकडून कमी पगारावर कामकरून घेताय. हया सगळ्या नकारात्मक बाबींशिवाय शहर जिल्हा राज्य आणि देशात चांगल्या अभियंत्यांच्या जोरावर शहरांचे आधुनिक सौंदर्य पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय-19, प्रवेश क्षमता – 7528, नाशिक जिल्हातील पॉलिटेक्निक महाविद्यालय-25, प्रवेश क्षमता- 9090

मांजरपाडा प्रकल्प Majarpada Project : अभियांत्रिकी कौशल्याचा वेगळा नमुना

मांजरपाडा प्रकल्प हा अभियांत्रिकी कौशल्याचा एक वेगळाच नमुना असणार आहे. दिंडोरी आणि कळवण तालुक्यात हा प्रकल्प उभारला जात असला तरी दिंडोरी, चांदवड, येवल्यासाठी फायदा होणार आहे. या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव डाव्या कालव्याद्वारे 63 किलोमीटरवरील दरसवाडी प्रकल्पात जाईल. दरसवाडी कालव्यातून 88 किलोमीटरवरील डोंगरगांव पोहोच कालव्यात म्हणजे एकूण 154 किलोमीटरच्या प्रवासाने हे पाणी डोंगरगाव तलावात टाकण्याचे नियोजन आहे.

कालव्यातून चांदवड तालुक्याटतील 5 व येवल्यातील 35 पाझर तलावासह 2 लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्यात येतील. प्रकल्पामुळे दिंडोरीतील सिंचनाला फायदा झाला आहे. शिवाय चांदवडमधील 63 किलोमीटर आणि येवल्यातील 88 किलोमीटरमधील अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

प्रकल्पाच्या ठळक बाबी : मांजरपाडा धरणाची एकूण लांबी : 3 हजार 450 मीटर, समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी : 722 मीटर, पूर्णसंचय पातळी : 718 मीटर आहे. अडवलेले नाले : 12, जोड आणि वळण बोगदा लांबी : 10.16 किलोमीटर, उनंदा नदीत हस्ते जवळ पाणी सोडण्यासाठी चर : 3.20 किलोमीटर, वळण योजनेसाठी संपादित जमीन : 64.24 हेक्टर वन आणि 30.18 हेक्टर खासगी, योजनेची किंमत : 328 कोटी 45 लाख. पुणेगाव धरणाद्वारे पाणी वितरित होणारे तालुके : चांदवड व येवला आगामी काळात पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविले जाणारे पाणी सुद्धा याच बोगद्याद्वारे गोदावरी खोर्‍यात पोहोचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या